अत्यावश्यक सेवेसाठी पंचवटी एक्सप्रेस सुरु करा, खासदार गोडसे यांची मागणी

653

अत्यावश्यक सेवेतील शेकडो कर्मचारी नाशिक जिल्ह्यातून मुंबईला ये-जा करतात, त्यांच्यासाठी पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही महिन्यांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली मनमाड – मुंबई ही पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस देखील बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाशिक जिल्ह्यातून मुंबई गाठणे अवघड ठरत आहे. त्यामुळे पंचवटी एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली.

ही मागणी योग्य असून पंचवटी एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वेचे महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या