
फळे आणि भाज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. आपल्या स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे ही कायम ठेवावीच लागतात. सर्व फळे आणि भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. काही घरांमध्ये फळे आणि भाज्या दररोज किंवा आठवड्याभराच्या एकदा आणून ठेवल्या जातात. अशावेळी या भरपूर फळांची आणि भाज्यांची योग्य साठवणूक हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा. खरंतर, काही फळे आणि भाज्या कधीही एकत्र ठेवू नयेत. असे केल्याने ते फळ किंवा भाजी खूप लवकर कुजण्यास आणि खराब होण्यास सुरुवात होते.
देशी तूप हे आपल्या चेहऱ्यासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या
कोणती फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नये
तुम्ही आणलेल्या भाज्या आणि फळांचे शेल्फ लाइफ वाढवायचे असेल, कोणती फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नयेत हे जाणून घ्या.
काकडी आणि टोमॅटो
आपण अनेकदा फ्रीजमध्ये भाजीपाल्या सोबत काकडी आणि टोमॅटो एकत्र ठेवतो. काकडी आणि टोमॅटो एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होऊ लागतात. टोमॅटोमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे काकडी लवकर कुजण्यास सुरुवात होते.
दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आपल्या आहारात कोणती फळे समाविष्ट करायला हवीत, वाचा
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी
उन्हाळ्यात येणारे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी एकत्र ठेवण्याची चूक करू नये. स्ट्रॉबेरीमधूनही इथिलीन वायू बाहेर पडतो. ज्यामुळे ब्लूबेरी लवकर कुजू शकतात. दुसरीकडे, ब्लूबेरी वजनाने थोडी जड असतात, त्यामुळे स्ट्रॉबेरी खराब होण्याचा धोका निर्माण होतो.
बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका
बहुतेक घरांमध्ये बटाटे आणि कांदे एकत्र ठेवले जातात. परंतु बटाटे आणि कांदे कधीही एकत्र ठेवू नयेत. असे केल्याने बटाटे लवकर अंकुरतात. कांदे कुजायला लागल्यावर, कांद्यातून इथिलीन वायू बाहेर पडतो. त्यामुळे बटाटे खूप लवकर खराब होण्यास सुरुवात होते. कांदे बटाटे एकत्र ठेवल्यामुळे बटाट्यांमधून ओलावा बाहेर पडतो. त्यामुळे कांदा लवकर कुजण्यास सुरुवात होते. म्हणून या कांदे बटाटे कधीही एकत्र ठेवू नयेत.
लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या




























































