
बिहारचे विधानसभा अध्यक्ष प्रेमकुमार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधकांच्या 42 आमदारांना पाटणा उच्च न्यायालयाने नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप एका याचिकेतून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिले. या आमदारांमध्ये ऊर्जा मंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांचाही समावेश आहे. न्यायालयाने या आमदारांना आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.





























































