ब्रह्मपुरी सर्वात हॉट, पारा 45.9 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट कायमच असून पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 45.9 अंश सेल्सिअस अशी नोंदविण्यात आली. येत्या दोन दिवसांत पारा 46 अंश पार करेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर 45.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून आग ओकणार्‍या सूर्यदेवतेमुळे चंद्रपुरातील नागरिक हैराण झाले आहे. एकीकडे वीजनिर्मिततीच्या भट्टय़ा तर दुसरीकडे सूर्य आग ओकत असल्यामुळे चंद्रपूर आगीच्या विळख्यात सापडले आहे. आज अकोला 44.6, अमरावती 43, बुलडाणा 42, ब्रह्मपुरी 45.9, चंद्रपूर 45.8, गडचिरोली 44.3, गोंदिया 43.5, नागपूर 44.2, वर्धा 45, वाशिम 43, यवतमाळ 43.5  अंश सेल्सिअस अशी नोंदविण्यात आली.