पॅराग्लायडिंग करताना ‘पवन’ची हवा टाईट, व्हिडीओ व्हायरल

1087

तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बांदा येथे राहणाऱ्या विपिन साहू नावाच्या तरुणाचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात हादरलेल्या विपिनची अवस्था बघून सगळीकडे हास्यकल्लोळ उठला होता. असाच हिमाचल प्रदेशमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव पवन आहे. मोठया फार्मात पवन पॅराग्लायडिंगसाठी गेला. पण हवेत उंचावर गेल्यावर मात्र त्याची हवा कशी टाईट झाली हे या व्हिडीओत दिसत आहे.

पवनचे हावभाव आणि घाबरल्याने सुरू असलेली भन्नाट बडबड या व्हिडीओत दिसत आहे. एवढेच नाही तर पवनची भीती घालवण्यासाठी त्याचा गाईड ज्योती ठाकूर हसतखेळत त्याची समजूत कशी काढतो हे देखील या व्हिडीओत बघण्यासारखे आहे. हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यतील बीड बिलिंग येथून पवन त्याच्या सहा मित्रांबरोबर दार्जिंलिंग फिरायला आला होता. पण पॅराग्लायडिंगची हौस त्याला महागात पडली. सुरुवातीला पवनला फार मजा आली पण जसेजसे ते उंचावर जाऊ लागले तसा पवन जाम घाबरला. मी उगाच आलो . मला खाली उतरव. अशी विनंती तो गाईडला करताना व्हिडीओत दिसत आहे. पण गाईड त्याला बोलण्यात गुंतवतो. त्यावर भीती घालवण्यासाठी आपण अंताक्षरी खेळुया असं म्हणत पवन गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण भीतिने गाळण उडाल्याने त्याच्या गळ्यातून स्वरच फुटत नाही. त्यातच उंचावर बेभान वारा वाहत असल्याने पवन ‘हवा कम करो ना’ असेही गाईडला सांगतो. एवढेच नाही तर पॅराशुटला छेद कर म्हणजे एवढी हवा येणार नाही आणि आपण पटकन खाली उतरू असा मजेशीर सल्लाही तो गाईडला देताना दिसत आहे.

पवनचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे गाईड ज्योती ठाकूर हा पॅराग्लायडींग स्काय डायविंग चॅम्पियन असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये त्याच्या नावाची नोंद आहे. तसेच हिंदु्स्थानमधील टॉप दहा पायलटमध्येही ज्योती ठाकुरचा समावेश आहे. पण एवढी तज्ज्ञ व्यक्ती आपल्या सोबत असतानाही पवनने मात्र यापुढे कधीही पॅराग्लायडींग न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या