… तर विरोधकांचा हात कलम करू, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

satpal-singh

सामना ऑनलाईन । मंडी

लोकसभेची निवडणूक आणि त्या निमित्ताने वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. हिमाचल प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भरभरून स्तुती केली. मात्र ते करत असतानाच त्यांनी मोदी विरोधकांना धमकी वजा इशारा देखील दिला. मोदींवर आरोप करत बोट दाखवण्याचा जो प्रयत्न करेल त्याचा हात कापून त्याच्याच हातात देऊ, अशी भाषा त्यांनी एका सभेत बोलताना वापरली आहे.

या वादग्रस्त विधानामुले विरोधकांनी आक्रमक होत टीका सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.