हिमाचल प्रदेश- दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

352

हिमाचल प्रदेश येथील मंडी येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे तिथे एका डोंगराळ भागात दरड कोसळून दोन वाहने त्या खाली दबली गेल्याचं वृत्त आहे. या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी हणोगी माता मंदिराजवळ रस्त्यावर हा अपघात झाला. या घटनेनंतर सदर रस्ता बंद झाला आहे. मंदिर आणि परिसरातील घरांनाही दरड कोसळल्याने नुकसान झालं आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रस्त्यावरील दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

उत्तराखंडमध्येही तुफान पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे गुप्तकाशी येथे केदारनाथच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचा 70 मीटरचा भाग वाहून गेला आहे. केदारघाटी परिसरात भूस्खलन होऊन अनेक घरं कोसळली आहेत. 40 हून अधिक कुटुंबांनी या परिसरातून दुसरीकडे स्थलांतर केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या