‘चिंता छोड़ चिंतामणी’ येत्या रविवारी

16

सामना प्रतिनिधी । मुंबई

यात्री प्रस्तुत वसंत कानिटकर लिखित आणि ओम कटारे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘चिंता छोड़ चिंतामणी’ या हिंदी नाटकाचा प्रयोग अंधेरीच्या मुक्ती कल्चरस ऑडिटोरियममध्ये येत्या रविवारी 30 जूनला रात्री 8 वाजता रंगणार आहे. या नाटकाच्या कथेनुसार एका माणसाला असे वाटते की त्याचे संपूर्ण कुटुंब विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आपण आहोत, म्हणून हे कुटुंब सुखरूप आहे असा त्यांचा समज असतो. दुसरीकडे त्यांची मुले असा विचार करतात की वडील आपल्याला काही करू देत नाहीत. मात्र हे पिढीतील अंतर नसून जुन्या माणसाला परिस्थिती समजण्यास असमर्थ आहे.

हे खरोखर पिढीचे अंतर आहे किंवा गैरव्यवहाराचीही बाब आहे का? आणि जर खरोखरच जनरेशनचा फरक असेल तर अंतर कमी करेल कोण? हे अर्थातच प्रत्यक्ष नाटकातच पाहायला मजा येईल. या नाटकात ओम कटारे, मुकेश यादव, पुनीत मालू, जय ओझा, मुकुंद भट्ट, अशोक शर्मा, केया गुप्त, वंदना डोगरा, सैली गायकवाड, प्रशांत उपाध्याय, रोहिन जोशी आणि विनीत लुनकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या