बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच असून सोमवारी रात्री आणखी एका हिंदू व्यक्तीची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. मागच्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंमध्ये दहशत पसरली आहे.

बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून अल्पसंख्याक हिंदूंना वारंवार लक्ष्य केले जात आहे. ईश्वरनिंदेचा आरोप करत मागील आठवडय़ात दीपू चंद्र दास या मजुराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून जाळण्यात आला. जिथे ही हत्या झाली, त्याच मेमनसिंह येथेच आणखी एकाचा जीव घेण्यात आला आहे. बजेंद्र विश्वास असे या 42 वर्षीय तरुणाचे नाव असून तो गारमेंट फॅक्टरीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.