
बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच असून बुधवारी रात्री एका 50 वर्षीय औषध विक्रेत्याला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ढाक्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खोकन दास असे पीडित इसमाचे नाव आहे. दास हे शरियतपूर जिह्यातील रहिवासी आहेत. कामावरून घरी परतत असताना काही लोकांनी घेरून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला व मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका तळ्यात उडी मारून पळ काढल्याने ते वाचले. मात्र, मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.

































































