ट्वीटमध्ये ‘हिंदू दहशतवादी’ असा उल्लेख, करण जोहरच्या चित्रपटाविरोधात संतापाची लाट

1726

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘तख्त’च्या विरोधात नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चित्रपटाच्या लेखकाने ट्वीटमध्ये हिंदुविरोधी लेखन करत हिंदू दहशतवादी असा उल्लेख केल्याने नेटकरी संतापले असून ट्विटरवर #BoycottTakht असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

करण जोहरच्या तख्त या चित्रपटाचं लेखन हुसैन हैदरी नावाच्या लेखकाने केलं आहे. काही दिवसांपूर्वी हुसैन याने हिंदू दहशतवादी असं ट्वीट टाकलं होतं. हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, ते वापरा… हिंदू दहशतवादी असं ते ट्वीट होतं. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक नेटकऱ्यांनी हुसैन याला झापायला सुरुवात केली. हुसैन याने करणच्या आगामी चित्रपटाचे लेखन केल्याची माहिती मिळताच नेटकऱ्यांच्या संतापाचा रोख करण जोहर आणि तख्तकडेही वळला.

hussain-hindu-terrorists

अनेकांनी हुसैन याला चित्रपटाचा लेखक पदावरून काढून टाकण्याची मागणी केली. तर अशा माणसाला चित्रपटात घेण्यासाठीही अनेकांनी करणला धारेवर धरलं. अशा लेखकाने लिहिलेला चित्रपट पाहू नका असं आवाहन करून अनेकांनी #BoycottTakht असा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली. अखेर नेटकऱ्यांनी चौफेर शाब्दिक चोप दिल्याने हुसैन हैदरी याने आपलं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या