हिंगोली – खड्ड्यात पडून विदर्भातील चार जणांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, सेनगाव जवळील घटना

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे सेनगाव पासून जवळच असलेल्या भानखेडा गावाजवळ पुलाचे बांधकाम मागील काही दिवसापासून ढकलल्याने बंद आहे. मात्र या पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने विदर्भातील कार खड्ड्यात पडून पाण्यात बुडून कार मध्येच गुदमरून चार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये चार शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते.

सेनगाव ते येलदरी व सेनगाव ते रिसोड या महामार्गाच्या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक न ठेवल्याने विदर्भातील लोणार तालुक्यातील पळसखेडा येथील शिक्षक शाळेवर आज रुजू होण्यासाठी जात असताना कार खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना 13 जूनच्या मध्यरात्री घडली. यामध्ये लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. चौघेही जण शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याकामासाठी रस्त्याच्या बाजूचाच मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन त्यातच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, खड्डयामध्ये वाहनाचा लाईट दिसत असल्याने काही गावकऱ्यांनी ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकऱ्यांनी तातडीने माहिती दिली तेव्हा सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार अनिल भारती, शिदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.

या मध्ये दोन मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरून दोघांची नांवे अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून त्यांच्या लोणार येथील कुटुंबियांशी संपर्क साधला असून ते काही वेळातच सेनगाव येथे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतर दोघांकडे ओळखपत्र सापडले नसल्याने त्यांची ओळख पटली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या मध्ये दोन मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरून दोघांची नांवे अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून त्यांच्या लोणार येथील कुटुंबियांशी संपर्क साधला असून ते काही वेळातच सेनगाव येथे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतर दोघांकडे ओळखपत्र सापडले नसल्याने त्यांची ओळख पटली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या