हिंगोलीत कोरोनासदृश्य आजाराने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई येथून हिंगोली तालुक्यातील एका गावात आलेल्या व्यक्तीचा आज 21 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनासदृष्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृत व्यक्तीच्या स्वॉबचा अहवाल आल्यावरच मृत्युचे स्पष्ट कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेने हिंगोली शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म कोरोना आजाराशी साधर्म्य असणारी लक्षणे आढळून आल्यानंतर या व्यक्तीला आज 21 एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत व्यक्तीच्या घशातील लाळेचे नमुने घेण्यात आले असून संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. या स्वाबचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मयत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह याबाबतचा उलगडा होणार आहे.