
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या नार्ंसग महाविद्यालयातील पाठयनिर्देशक पदाच्या (नार्ंसग शिक्षक) परीक्षेत 151 विद्यार्थी मेरिटवर पास झाले. मात्र, परीक्षेचा निकाल लागून एक वर्ष झाले तरी या विद्यार्थ्य्नां नार्ंसग शिक्षकांची नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने पाठय़निर्देशक पदाची पदे भरण्यासाठी 2018 साली जाहिरात दिली. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा 2021 साली झाली. यात 151 विद्यार्थी पास झाले. मात्र, सरळसेवा भरती प्रक्रियेतून राबववण्यात आलेल्या या परीक्षेला शासकीय सेवेतील काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरळसेवा भरतील सर्व उमेदवारांना नियुक्ती द्यावी, असे आदेश सरकारला दिले. त्याचबरोबर अप्पर सचिव आणि मुख्य सादरकर्ता अधिकारी मॅट मुंबईलादेखील भरती प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश आयुक्त आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना दिले. मात्र, न्यायालयाने आदेश दिले असतानाही अजूनही या 151 विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारने याची तत्काळ दखल घेऊन नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

























































