MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा, 15 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱया राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपसमितीने परवानगी दिलेल्या आणि उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली पदे भरण्यासाठी  येत्या 15 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. 4 मे 2021 आणि  24 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून ही रिक्त पदे भरण्याचा निर्णय एमपीएससीच्या आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

ही पदे भरताना विशेष बाब म्हणून  4 मे 2021 आणि  24 जून 2021 च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी. न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन ही  पदे भरावीत.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

 

आपली प्रतिक्रिया द्या