
सामना प्रतिनिधी । मुंबई
नवीन वर्षात चाकरमान्यांची चंगळ असणार आहे. केवळ तीनच सुट्ट्या रविवारी येत आहेत. त्यामुळे यंदा सुट्ट्याच सुट्ट्या मिळणार आहेत. नवीन वर्षात नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणार असल्याने दिवाळी फक्त चारच दिवस येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद -ए-मिलाद या तीनच सुट्ट्या यंदा रविवारी येत आहेत. त्यामुळे उरलेल्या 21 सुट्ट्या इतर वारी येणार आहेत. नवीन वर्षात वसूबारस आणि धनत्रयोदशी एकाच दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी येत आहे. 27 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन येत असून 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीज येत असल्याने दिवाळी चारच दिवस असणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
लग्नाळू आणि सोने खरेदी करणाऱयांसाठी खूशखबर
लग्नाळू आणि सोने खरेदी करणाऱयांसाठी नवीन वर्ष भरभराटीचे असणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तीन महिने वगळता इतर नऊ महिने विवाहाचे मुहूर्त आहेत. सोने खरेदी करणाऱयांसाठी नवीन वर्षात 6 जून, 4 जुलै आणि 1 ऑगस्ट असे तीन गुरुपुष्ययोग येणार आहेत. त्यामुळे या दिवशी मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होईल.
पाच ग्रहणे दिसणार
नवीन वर्ष हे लीप वर्ष नसल्याने हे वर्ष 365 दिवसांचेच असणार आहे. नवीन वर्षात 3 सूर्यग्रहणे आणि 2 चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत.























































