हॉलीवूडपटांची मेजवानी आता मराठीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात हॉलीवूडपटांचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.   या चाहत्यांसाठी आणि हॉलीवूड चित्रपटप्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हॉलीवूड चित्रपटांची मेजवानी त्यांना आता घरबसल्या घेता येणार आहे, तेसुद्धा चक्क मराठीत!  ‘अल्ट्रा हॉलीवूड’ या यूटय़ूब चॅनेलवर हॉलीवूडपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

‘अल्ट्रा हॉलीवूड’ यूटय़ूब चॅनेलवर ‘अगेंस्ट द वाइल्ड II’, ‘बार्क रेंजर’, ‘ज्युरासिक गॅलेक्सी’, ‘सिजलिंग बेबी पांडा’, ‘रसेल मॅडनेस’, ‘कॉन्ट्रक्ट टू किल’, ‘द डिफेंडर’, ‘वेक ऑफ डेथ’, ‘द स्टोलन प्रिंसेस’, ‘एयर 3’, ‘एयर 4, ‘एयर 5’ यासारखे हॉलीवूडपट पाहायला मिळतील. अल्ट्राच्या ‘हॉलीवूड मराठी’ व ‘अल्ट्रा किडस्’ या यूटय़ूब चॅनेलच्या विभागात मराठीत डब केलेले गाजलेले हॉलीवूड आणि ऑनिमेशन चित्रपट पाहता येतील.