असं झालं तर… गृहकर्ज पूर्णपणे संपले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहकर्ज (होम लोन) संपले की, आपण सुटकेचा निःश्वास टाकतो, पण लक्षात घ्या की गृहकर्ज फेडल्यानंतर काही गोष्टी करणे खूप आवश्यक असते. त्या टाळू नका.

मूळ कागदपत्रे परत घ्या ः बँकेकडे ठेवलेली घराची मूळ कागदपत्रे (उदा. सेल डीड, टायटल डीड, पॉवर ऑफ अटर्नी) परत घ्या आणि ती व्यवस्थित तपासा.

‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घ्या ः बँक सर्व कर्ज फेडल्याचे प्रमाणपत्र (नो डय़ू सर्टिफिकेट) देते, ते घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून भविष्यात त्रास होणार नाही.

रजिस्ट्रार किंवा महापालिका कार्यालयात जाऊन मालमत्तेवरील बँकेचा हक्क रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून मालमत्ता पूर्णपणे तुमच्या नावावर होईल.

सिबिल रिपोर्ट अपडेट करा ः कर्ज खाते बंद झाल्याची माहिती सिबिल आणि इतर क्रेडिट ब्युरोला दिल्याची खात्री करा, हे साधारणतः 30-45 दिवसांत अपडेट होते.