केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

5679

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शहा यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली होती, याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात उपचारासाठी भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे’, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूची वाढती संख्या पाहता अमित शहा यांनी कमान सांभाळली आणि स्वतः जातीने लक्ष घातले. कोरोनावर आळा घालण्यासाठी सतत बैठकांच्या निमित्ताने ते अनेकांच्या संपर्कात आले. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी चाचणी केली आणि आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या