केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आली असली तरी अमित शहा काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

‘आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी ईश्वराचे आभार मानतो आणि माझ्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या, माझ्यासह माझ्या कुटुंबियांचा हुरूप वाढवणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शहा 2 ऑगस्टला दिल्लीतील मेदांता भरती झाले होते. शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आता 12 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते आजच रुग्णालयातून घरी रवाना होतील.

आपली प्रतिक्रिया द्या