
महाराष्ट्रात शेंगदाण्याची चटणी आवडीने खाल्ली जाते. ही चटणी बाराही महिने खाल्ली जाते. त्यामुळे शेंगदाण्याची चटणी खराब होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चटणी बनवल्यानंतर ती थंड ठिकाणी, हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास बराच काळ खराब होत नाही. चटणीला जास्त उष्णता किंवा प्रकाशापासून दूर ठेवा. n चटणीला स्वयंपाकघरातील पेंट्री किंवा कपाटात थंड ठिकाणी ठेवू शकता. हवाबंद डबा आणि फ्रीजरमध्ये एका बॅगेत ठेवल्यास चटणी बरेच दिवस चांगली राहते. चटणी मिक्सरमध्ये बनवताना तिला जास्त काळ मिक्सरच्या ग्राऊंडरमध्ये ठेवू नका. चटणीतील नारळ तेल सोडून चटणी खराब होऊ शकते.