हे करून पहा- दही जास्त आंबट होण्यापासून वाचवा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दही जास्त आंबट होऊ नये म्हणून, दुधाचे तापमान नियंत्रित ठेवा, स्टार्टर कमी वापरा आणि ते घट्ट झाल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवा.

उन्हाळ्यात जिवाणूंची झपाटय़ाने वाढ होते, त्यामुळे योग्य हाताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. दही घट्ट होत असताना त्यात कच्च्या नारळाचा लहान तुकडा टाकल्यास ते खूप लवकर आंबट होण्यापासून वाचते.

जर तुम्हाला दही जास्त काळ साठवायचे असेल, तर चिमूटभर मीठ घातल्याने जिवाणूंची वाढ मंदावते.

दह्यावर थोडे साधे पाणी टाकल्याने त्याचा आंबटपणा आणि ताजेपणा टिकून राहण्यासही मदत होते.