घरातला वायफाय आरोग्यासाठी घातक आहे का ?

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे हल्ली बऱ्याच जणांच्या घरी वायफाय सुविधा आढळते. याचा शरीरावर काही परिणाम होतो का हे आज आपण जाणून घेऊया.

घरातील वायफायच्या लहरी आरोग्यासाठी घातक असतात का? या प्रश्नाला Quora या मंचावरील प्रश्नाला शिरीष मुळेकर यांनी पुढील उत्तर दिले आहे.

अशा लहरींमुळे किती शारीरिक हानी होते यावर अजून संशोधन आवश्यक आहे. परंतु, उपलब्ध माहितीनुसार आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. उपलब्ध माहिती ही आजवर झालेल्या संशोधनावर बेतलेली आहे व त्यानुसार घरातील WiFi  च्या लहरी तसेच मोबाईलच्या लहरी यामुळे आरोग्यास नुकसान होत नाही.

यात तरंगलांबीनुसार (wavelength) अशा लहरी दोन भागांत विभागल्या आहेत. एक आहेत non-ionising radiation व दुसरा आहे ionising radiation. Non-ionising radiation च्या तुलनेत ionising radiation मधे मोठी वारंवारता (frequency) व छोटी तरंगलांबी (wavelength) असते व त्यांमुळे त्यांस एखाद्या पेशीचे विघटन करायची शक्ती मिळते. तुलनेत ही शक्ती non-ionising radiation मधे नसते किंवा कमी असते. यांमुळे पेशींचे विघटन होत नसल्याने आरोग्यावर थेट हानीकारक परीणाम होताना दिसलेले नाहीत.

मात्र दोनही प्रकारच्या लहरी या शरीरामध्ये शोषली जातात. शरीरात शोषल्यावर non-ionising radiation मुळे पेशींचे विघटन होते व शरीराची हानी होते हे नक्की. या प्रकारच्या लहरी म्हणजे आपण हाडांचे फोटो घेण्यासाठी वापरतो ते x-ray वगैरे.

मोबाईल व WiFi च्या लहरी non-ionising radiation प्रकारातील आहेत. त्यामुळे नेमकी काय हानी होते किंवा काहीच हानी होत नाही याबाबत अजूनतरी काही प्रमाणात संभ्रम आहे. दृश्य स्वरूपात हानी होत नसली तरी या लहरी जिथे पोचतात किंवा उत्पन्न होतात अशा उपकरणापासून दुर राहणे इष्ट. म्हणूनच मोबाईलचा वापर मर्यादीत ठेवा असे सल्ले दिले जातात त्याच प्रमाणे WiFi चा राउटर जरा दूर असल्यास योग्य ठरेल.

टीप – सदर लेख हा quora या साईटवरील उत्तरावरून घेतला आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या