हनी सिंहने पायाने उचलले 358 किलो वजन

लोकप्रिय रॅप सिंगर यो यो हनी सिंह आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी सिंगिंग स्टाईल तर कधी वर्कआऊट. आताही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडियोमुळे तो चर्चेत आलाय. या व्हिडियोत हनी सिंहने दोन्ही पायांनी 358 किलो वजन उचलले आहे. याबद्दल चाहत्यांकडून त्याला शाब्बासकी मिळाली आहे. व्हिडियोमध्ये हनीसोबत त्याचे दोन साथीदार आहेत. त्यांच्यासोबत तो वर्कआऊट करताना दिसत आहे. व्हिडियोला कॅप्शन देताना हनीने लिहिलंय, 358 किलोचे वजन आहे. ते 10 वेळा मला रिपीट करायचं होतं. पाच वेळा सराव करावा लागला. शेवटी यश मिळालं. आयुष्यात नेहमी उंच लक्ष्य ठेवा. आयुष्य एकदाच मिळतं…

हनी सिंहचा व्हिडियो लाखो चाहत्यांनी बघितला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. हनी सर्वाधिक पैसे घेणारा गायक आहे, असं म्हटलं जातं. देशविदेशात त्याच्या कॉन्सर्ट होतात. सर्वाधिक कर भरणाऱया सेलिब्रेटींमध्ये त्याची गणना होते.

आपली प्रतिक्रिया द्या