दरवर्षी मधुचंद्र

निखिल आणि मयूरी, सिंगापूरच्या केबल कारमध्ये रंगलेल्या गप्पा, खरेदी आणि बरेचसे खास क्षण…

मधुचंद्र म्हणजे – प्रत्येक नवरा-बायकोच्या आयुष्यातला आनंददायी, मधुर आणि अविस्मरणीय असा क्षण.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – खरं तर बॅचलर्सच्या जशा फँटसीज असतात तशा आम्हा दोघांच्याही मधुचंद्राच्या बाबतीतल्या फँटसीज होत्या. त्यातली सगळ्यात मोठी होती की, मधुचंद्राला परदेशात कुठेतरी छान ठिकाणी जायचं, परंतु लग्नाच्या धावपळीतून बाहेर पडल्यानंतर सुट्टी हा खूप मोठा प्रश्न आम्हा दोघांसमोर उभा ठाकला होता. कारण आधीच लग्नासाठी दोघांनीही महिनाभर सुट्टी काढली असल्यामुळे ताबडतोब दोघांनाही कामाकर रुजू होणे खूप गरजेचं होतं, पण लग्नाच्या काही वेळाने माझ्या एका सिनेमाच्या शूटिंगनंतर आणि मयूरीने जॉब बदलल्यामुळे दुसरा जॉब जॉईन करीपर्यंत तिला सुट्टी होती. त्यामुळे दोघांकडेही एकमेकांना द्यायला भरपूर वेळ होता आणि आम्ही सिंगापूरचं प्लॅनिंग केलं.
तिथले आवडलेले ठिकाण? – खरं तर जवळपास आठ-दहा दिवस मनसोक्त सिंगापूर फिरलो आणि आम्हा दोघांनाही आवडलेलं ठिकाण म्हणजे सेंटोसा आयलंड. आम्ही तिथे जवळपास चार ते पाच दिवस होतो. .ठिकाणाचे वर्णन – स्वच्छ सुंदर असं हे सेंटोसा. दिवसभर वेगवेगळ्या राइडस्मध्ये, युनिव्हर्सल स्टुडिओपासून वेगवेगळ्या बीचेसकर धमाल-मस्ती केल्यानंतर रात्री आठनंतर अत्यंत शुकशुकाट आणि शांत निसर्गरम्य ठिकाण. खरं तर हे टुरिस्टसाठी खास तयार केलेलं असं ठिकाण आहे.
तिथे केलेली शॉपिंग – सिंगापूरला माझं बऱ्याचदा जाणं झालं आहे. त्यावेळी शॉपिंग केलीच, पण मयूरी पहिल्यांदाच आली असल्यामुळे तिची शॉपिंगची लिस्ट खूप मोठी होती.
काही खास क्षण – त्यासाठीच तर गेलो होतो. आम्ही केबल कारमध्ये बसून दोन तास खूप छान गप्पा मारल्या. गाणी गायली, ऐकली. तीही दोनशे फूट उंचीवरून. झालं असं की, रात्रीच्या वेळी केबल कारच्या दोन राऊंड चुकून झाल्या आणि साधारण एक राऊंड पूर्ण व्हायला पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे लागतात आणि अशा दोन राऊंड झाल्या, पण खूप छान! 200 फुटांकरून अख्खं सेंटोसा आयलँड पाहत, गाणी गुणगुणत, ऐकत एकमेकांना वेळ देता आला.
मधुचंद्र हवाच की… – हवाच. एकमेकांना वेळ देण्याकरिता. खरं तर दरवर्षी आम्ही ठरकून सुट्टीसाठी कुठेतरी बाहेर जात असतोच यावर्षीपासून हे प्रकर्षाने ठरवलंय की, आमच्या ऑनिव्हर्सरीला दरवर्षी आपण मधुचंद्राला जायचं. हो, मधुचंद्र! असं कुठेही लिहिलेलं नाही की, लग्नानंतर पहिल्या रात्री जो होतो तोच मधुचंद्र. मधुचंद्र म्हणजे प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराला दिलेला त्याचा असा स्पेशल दिवस, वेळ आणि आनंद.
एकमेकांशी नव्याने ओळख – अर्थातच आमच्या पहिल्या मधुचंद्रानंतर मला हे जाणवलं की, माझी जोडीदार मला, माझ्या घरच्यांना समजून घेणारी आहे. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मधुचंद्राला गेल्यानंतरसुद्धा हे जाणवतंय. नात्यातला तो गोडवा, प्रेम अजूनच वाढला आहे. राग, रुसवे, भांडणं ती हवीतच, पण हा ब्रेक फार महत्त्वाचा असतो. माझे अनेक विनोद, शाब्दिक कोटय़ा यांची ती पहिली प्रेक्षक असते. ती मला नेहमी प्रोत्साहन देते.
किती दिवस द्यावेत… – खरं तर धावपळीच्या आजच्या आपल्या लाइफ स्टाईलमध्ये फार दिवस काढणं खरंच मुश्कील असतं, पण काही दिवसांची किंवा वन डे पिकनिकसुद्धा खूप काही देऊन जाते तुमच्या नात्याला.
तिथला आवडलेला खाद्य पदार्थ – तिथल्या स्ट्रीट फूडचीसुद्धा टेस्ट घ्यावी म्हणून ‘Lau Pa Sat’ Raffles Quay ला जाऊन चक्क मेनूकार्डकर डोळे झाकून बोट ठेवून बोट खाली घेऊन जिथे थांबेल तो पदार्थ ऑर्डर करायचा असे ठरले. केरियन डिश होती, पण त्याची चक अजूनही दोघांच्या जिभेवर रेंगाळते आहे.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम… – अनोळखी ठिकाणी ओळखीचा माणूस सोबत असेल तर ते अनोळखी ठिकाणसुद्धा अनोळखी वाटत नाही आणि रोमान्स म्हणजे मी ‘डिम्पल बॉय’, ‘चॉकलेट बॉय’ असल्यामुळे ते माझी बायकोच सांगू शकते.
जोडीदाराची खास आठवण – लग्नाच्या पहिल्या वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी पुण्याला गेलो होतो. रात्रभर विसर्जन मिरवणूक पाहिली. स्वारगेटला शिवनेरी स्टँडला गेलो. संपूर्ण वेटिंग रूममध्ये आम्ही दोघंच असल्यामुळे त्या गर्दीत, गोंगाटातसुद्धा खूप छान वाटत होतं. अचानक मला मयूरीच्या किंचाळण्याचा आवाज आला. एक माणूस तिची पर्स चोरत होता. मी रागाने त्याच्या हातातून ती पर्स आणि बॅग ताब्यात घेतली. रडवेली झालेली मयूरी पाहून मला कसंतरी झालं. गर्दीत त्याचं पाकीट हरवलं होतं. घरी जायला पैसे नाहीत म्हणाला. म्हणून फक्त तिकिटापुरते पैसे काढायला पर्स उघडली होती. खरंखोटं देव जाणे, पण मयूरीच्या सांगण्यावरून त्याला पोलिसांच्या हवाली न करता सोडून दिलं. शिवाय मयूरीने त्याला पाचशे रुपये दिले. तिला दया आली. म्हणाली, अशी वेळ कोणावरही येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या