सागर किनारे… सानिका अभ्यंकर-प्रथमेश कुलकर्णी

510

लग्नानंतर समुद्राच्या साक्षीने दोघांमधील मैत्री अजूनच घट्ट झाली….

मधुचंद्र म्हणजे – दोन व्यक्तींनी एकमेकांसाठी एकत्र घालवलेले खास क्षण.
फिरायला जायचे प्लॅनिंग कसे केले? खरं तर आमचं लग्न अगदी टिपिकल अरेंज मॅरेज आहे. एका मॅट्रिमोनिअल साईटवर आमची ओळख झाली आणि दोन भेटींमध्येच लग्न ठरलं. पण लग्नाचं प्लॅनिंग केलं नाही. तेकढा वेळ फिरायला जायची जागा ठरवण्यात गेला. दोघांनाही समुद्र प्रचंड आवडतो त्यामुळे एखाद्या ‘beach city’ ला जायचं हे नक्की होतं. 2 महिने अगदी युरोपपासून सगळीकडे शोधून झालं; पण मनासारखं ठिकाण सापडत नव्हतं. एक दिवस सहज बोलता बोलता मालदीवचा विषय निघाला आणि काही फोटो बघितल्यावर, हॉटेल्सची माहिती काढल्याकर मालदिवला जाण्याचे निश्चित झाले.
आवडलेले ठिकाण… मालदिवमधल्या अनेक बेटांपैकी आम्ही मिरू बेट निवडलं आणि ते संपूर्ण बेट एका रिसॉर्टमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. चारही बाजूला समुद्र, बेटावर प्रचंड प्रकारची झाडं, उत्तम जेवण आणि वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स असं असल्यामुळे दुसरीकडे जाण्याची गरजच भासली नाही. इतकं सुंदर वातावरण होतं.
ठिकाणचे वर्णन… मिरू आयलॅण्ड रिसॉर्ट ऍण्ड स्पा हे अगदी स्वप्नवत होतं. पाण्यात असलेला आमचा व्हिला आणि आजूबाजूचं सौंदर्य हे कधीही संपू नये असंच वाटत होतं.
तिथे केलेली शॉपिंग – इथे आम्हाला नारळाचा झाडाच्या विविध भागांचा उपयोग करून बनवलेल्या डायरिज मिळाल्या. सगळ्यात जास्त आवडलेली खरेदी म्हणजे मालदिवचे पारंपरिक वाद्य बेरू.
काही खास क्षण – रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या व्हिलाच्या डेकवर पाय सोडून बसलो होतो. डेकच्या खाली समुद्र होता. तिथे बसून आम्ही 2 तास सुंदर, दुर्मिळ मासे बघितले. तो क्षण अगदी निवांत घालवला.
मधुचंद्र हवाच कीः हा खरंतर प्रत्येकाचा वैयक्तिक विचार आहे. दोघांच्यां बिझी शेडय़ुलमुळे जो वेळ लग्नाआधी नाही मिळाला तो सगळां वेळ तिथे मिळाला. एकमेकांना अजून व्यवस्थित जाणून घेता आलं. हा काळ जितका रोमँटिक होता, तेवढाच नातं खुलवण्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे, मधुचंद्र हवाच.
एकमेकांशी नव्याने ओळख – मालदीवला गेल्यानंतर हळूहळू गप्पा काढायला लागल्या आणि एक चांगला माणूस आणि उत्तम मित्र मला तिथे भेटला.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत – हा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण कोणालाही दिवसांमध्ये नाही ओळखू शकत. एखाद्याला काही वेळात आणि एखाद्याला कित्येक वर्षात ओळखू शकत नाही. त्यामुळे आपलं बॉण्डिंग ठरवतं की आपण कोणाला कसे ओळखतो ते.
तिथला आवडलेला पदार्थ – कोकोनट करी आणि राईस, तसेच इतर पारंपरिक पदार्थ नक्कीच आमच्या पसंतीस पडले.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसीजम – माझ्या मते, अनोळखी ठिकाणी एक केगळा रोमँटिसिजम आहे. हे अख्ख बेट पालथं घालताना आणि तिथल्या वेगवेगळ्या जागा अनुभवताना आम्हाला खूप मजा आली आणि ते नक्कीच खूप रोमॅण्टिक होतं.
जोडीदाराची खास आठवण… – ही ट्रिप प्रथमेशने एकटय़ाने प्लॅन केली. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याने माझ्या सगळ्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या. यामुळे त्याच्यातली चिकित्सक वृत्ती तर कळलीच पण त्याच्या विचारीपणाचं कौतुकही काटलं.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – मधुचंद्रानंतर आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे आणि दोन वर्षानंतर सुद्धा एकमेकांच्या सहवासाचा ‘कंटाळा’ आलेला नाही. उलट खूप मजा येतेय. तो फार शांत आणि समजूतदार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या