हनिमूनला आईला सोबत घेऊन जाणं महागात, नवरा आणि आईने बांधली लग्नगाठ

5474

हनिमून हा जोडप्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय काळ असतो. भावी सहजीवनाची ती गोड सुरुवात असते. पण, एका महिलेच्या बाबतीत मात्र तिचा हनिमून भलत्याच कारणासाठी अविस्मरणीय ठरला आहे. कारण, या हनिमूननंतर तिच्या आईनेच तिच्या नवऱ्याशी लग्न केलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरेन वॉल असं या महिलेचं नाव आहे. आता लॉरेन 34 वर्षांची आहे. तिने 2004मध्ये पॉल नावाच्या माणसाशी लग्न केलं. तिच्या लग्नात तिची आई ज्युली हिने 14 लाख रुपये खर्च केले होते. लग्नापूर्वीपासून लॉरेन आणि पॉल लिव्ह इन नात्यात राहत होते. त्यांना एक मूलही झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या लग्नानंतर लॉरेन आणि पॉल हनिमूनला गेले. पण, लग्नामुळे आनंदी झालेली लॉरेन ज्युलीलाही सोबत घेऊन गेली. हनिमूनच्या वेळी ज्युली आणि पॉल एकमेकांच्या जवळ आले. मात्र, त्यांच्या नात्यावर लॉरेनला शंका आली नाही. मात्र, लग्नाच्या 8 आठवड्यानंतरच तिला सत्य कळलं. त्यानंतर पॉल हा लॉरेनच्या घरातून निघून गेला आणि तिची आई ज्युलीसह राहू लागला. 2005मध्ये म्हणजे लॉरेन आणि पॉलच्या विवाहाच्या नऊ महिन्यांनंतर लॉरेनची आई ज्युली हिने पॉलच्या मुलाला जन्म दिला. यामुळे लॉरेनचं विश्व उद्ध्वस्त झालं. लॉरेन आणि पॉल विभक्त झाल्यानंतर ज्युली आणि लॉरेनने 2009मध्ये लग्नगाठ बांधली.

लॉरेनने काही काळापूर्वीच आपल्या आयुष्यातल्या या धक्कादायक आणि वेदनामय कोपऱ्याच्या आठवणी एका माध्यमाच्या मुलाखतीवेळी सांगितल्या. पॉलपासून विभक्त झालेल्या लॉरेनला नवा साथीदार भेटला आहे. तर तिची आई ज्युली आणि पॉल यांचा संसार अद्यापही सुरू आहे, अशी माहितीही लॉरेनने या मुलाखतीत सांगितली.

आपली प्रतिक्रिया द्या