भविष्य – रविवार 24 ते शनिवार 30 जानेवारी 2021

>>नीलिमा प्रधान

मेष – वर्चस्व वाढेल

मेषेच्या एकादशात बुध, दशमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेताना चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या डावपेचांना विशेष म हत्त्व प्राप्त होईल, वर्चस्व वाढेल. नोकरीत कौतुक होईल. मनासारख्या घटना घडतील. कला, साहित्य क्षेत्रात यश मिळवाल. शुभ दिनांक ः 25, 26

वृषभ – नव्या कार्याचा आरंभ कराल

वृषभेच्या दशमेशात बुध, भाग्येशात शुक्र राश्यांतर होत आहे. प्रत्येक दिवस कार्याला नवी दिशा देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज युक्तीने दूर कराल. नव्या कार्याचा आरंभ कराल. मनावरील दडपण कमी होईल. कला, चित्रपट, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. शुभ दिनांक ः 28, 29

मिथुन – बेसावध राहू नका

मिथुनेच्या भाग्येशात बुध, अष्टमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. कोणतेही काम करताना बेसावध राहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपयशाबद्दल बोलले जाईल. व्यवसायात व्यवहारात फसगत होईल. नोकरीत बोलताना उतावळेपणा नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. कायद्याचे पालन करा. शुभ दिनांक ः 26, 27

कर्क – योजनांना प्रसिद्धी मिळेल

कर्केच्या अष्टमेशात बुध, सप्तमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. किरकोळ अडचणींवर मात करून महत्त्वाची कामे करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार मिळेल. तुमच्या योजनांना प्रसिद्धी मिळेल. प्रेरणादायक घटना घडतील. वाटाघाटीचा प्रश्न योग्य मार्गाने सोडवाल. शुभ दिनांक ः 29, 30

सिंह – मानसिक तणाव वाढेल

सिंहेच्या सप्तमेशात बुध, षष्ठेशात शुक्र राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात कठीण परीक्षेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चोहोबाजूंनी तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. मानसिक तणाव वाढेल. व्यवसायात अडचणी वाढतील. चित्रपट, कला क्षेत्रात जिद्दीने पुढे जा. शुभ दिनांक ः 24, 26

कन्या – समस्यांतून बाहेर पडाल

कन्येच्या षष्ठsशात बुध, पंचमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. कामाबाबत वेळेला महत्त्व द्या. थोरामोठय़ांच्या मदतीने समस्येतून बाहेर याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार लाभतील. व्यवसायात चांगली संधी शोधा. कर्जाचे काम मार्गी लागेल. नवीन परिचयाने उत्साह वाढेल. पर्यटनाचा विचार कराल. शुभ दिनांक ः 26, 27

तूळ – नियमबाह्य कृती नको

तुळेच्या पंचमेशात बुध, सुखस्थानात शुक्र राश्यांतर होत आहे. एखादा निर्णय मनाविरुद्ध घेण्याची वेळ येईल. तडजोडीने निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपरोक्ष कारस्थाने होतील. कोणतेही वक्तव्य नियमाला धरून करा. नोकरीत कामाचा व्याप असला तरी नियम मोडू नका. शुभ दिनांक ः 26, 27

वृश्चिक – यश संपादन कराल

वृश्चिकेच्या सुखेशात बुध, पराक्रमात शुक्र राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या यशाची पताका सर्वत्र फडकेल. नवीन दिग्गज लोकांचा परिचय होईल. व्यवसायात योग्य निर्णय घेता येईल. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात उच्च यश संपादन कराल. शुभ दिनांक ः 24, 28

धनु – कामाचा व्याप वाढेल

धनुच्या पराक्रमात बुध, धनेशात शुक्र राश्यांतर होत आहे. उन्नतीचा नवा पर्याय दिसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक अडचणी येतील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. विरोध करणारे लोक तुमच्यासमोर उघडे पडतील. नोकरीत अनेक कामं एकाच वेळी आल्याने व्याप वाढेल. शुभ दिनांक ः 26, 30

मकर – रागावर ताबा ठेवा

मकरेच्या धनेशात बुध, स्वराशीत शुक्र प्रवेश करीत आहे. अडचणी दूर करून कामांना गती द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. मात्र विरोधक दडपण आणतील. रागावर ताबा ठेवा. व्यवसायातील समस्येवर पर्याय शोधा. नोकरीत वर्चस्व वाढेल. प्रसिद्धीचे नवे दार तुमच्यासाठी खुले होईल. शुभ दिनांक ः 24, 28

कुंभ – प्रसंगाचे गांभीर्य ओळखा

स्वराशीत बुध, कुंभेच्या व्ययेशात शुक्र राश्यांतर होत आहे. समस्या सोप्या नसतात. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा उद्देश चांगला असला तरी गैरअर्थ काढला जाईल. तुमचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. शुभ दिनांक ः 26, 27

मीन – संधीचा लाभ घ्या

मीनेच्या व्ययेशात बुध, एकादशात शुक्र राश्यांतर होत आहे. वेळेचा उपयोग करा. मोलाची संधी सोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे मुद्दे आक्रमक ठरतील. कामं वेगाने पूर्ण करा. नोकरीत वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. धंद्यात जम बसेल. शुभ दिनांक ः 24, 25

आपली प्रतिक्रिया द्या