
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता असाच एक स्टार चर्चेत आला आहे. हा स्टार म्हणजे जोधपूरचा राणा नावाचा घोडा आहे. तो त्याच्या अफलातून डान्सने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये जत्रेत ढोल आणि भांगड्याच्या तालावर एक पांढरा घोडा डोलताना दिसतो. राणा घोडा संगीतात अगदी छान तालावर नाचतो. ढोलाचा ताल वाढतो तसा घोड्याचा उत्साहही वाढतो. तो इतर कोणाकडेही जराही बघत नाही. त्याची एकाग्रता थक्क करणारी आहे. इन्स्टाग्रामवर @aryanbikaneri या अकाउंटवरून शेअर केलेला हा अद्भुत व्हिडिओ 8.8 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच व्हिडिओला हजारो कमेंट्स आल्या आहेत. नव्या डान्सिंग स्टारचे नेटिजन्स भरभरून कौतुक करत आहेत.































































