असं झालं तर… घर भाड्याने घ्यायचे असेल…

आजही अनेक लोक भाडय़ाने राहतात. विशेषतः दिल्ली, मुंबई, बंगळुरूसारख्या मोठय़ा शहरांमध्ये नोकरीसाठी स्थायिक झालेले लोक सहसा घरे भाडय़ाने घेतात.

तुम्हीपण भाडय़ाने घराच्या शोधात असाल तर काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि भाडेकरू म्हणून तुमच्या हिताचे रक्षण करू शकाल.

रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोहक डील्सला बळी पडू नका. तुम्ही ज्या परिसरात घर शोधत आहात तेथील सरासरी भाडे तपासा आणि तुम्हाला काय ऑफर केले जात आहे ते समजून घ्या.

टोकन मनी जमा करण्यापूर्वी तुम्ही प्रत्यक्ष मालमत्तेला पाहा आणि तपासणी करा. मालमत्तेला व्यक्तिशः भेट देऊन संभाव्य खरेदीदार मालमत्तेची स्थिती पाहू शकतात

फक्त ब्रोकरच्या शब्दावर विसंबून राहू नका. मध्यस्थांकडे कोणतेही पैसे हस्तांतरित करू नका, त्याऐवजी थेट मालकाच्या खात्यात टाका.