
राज्यातील पालिका केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर मालमत्ता कर बिल आकारतात. INDEX-2 वर अनेक नावे असतील तर नगरपालिका पहिल्या नावावर बिल काढते.
असे मानले जाते की, बिलामध्ये नाव असलेली व्यक्ती बिले भरण्याची जबाबदारी घेते. एकापेक्षा जास्त नाव जोडायचे असल्यास ‘कर संकलन’ विभागाशी संपर्क साधू शकता.
दस्तऐवजात अधिक नावे जोडणे तहसीलदार/तलाठी किंवा राजस्व निरीक्षक यांच्या अखत्यारीत येते. या कामी दिरंगाई होत असेल तर दिवाणी कोर्टात दावा करता येईल.
पत्नीच्या निधनानंतर वारसा हक्क मिळवण्यासाठी कोर्टात प्रकरण दाखल करावे लागेल. इतर कागदपत्रांशिवाय पत्नीच्या मृत्यूचा दाखला जोडावा लागेल.
अर्जदारास वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी लागेल. अन्य कुणी हक्क न दाखवल्यास पत्नीच्या मालमत्तेवर वारसदार म्हणून कोर्टाची परवानगी मिळेल.




























































