दिवसातून किती चपात्या खाव्यात ?

142

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायटींगचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की वाचा. कारण वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी जेवण कमी करतो. जास्त चपात्या खाल्ल्याने वजन वाढतं असं आपल्याला वाटतं. मग वजन वाढेल या भीतीने अनेकजण चपात्या कमी खातात किंवा खाणचं टाळतात. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर जाणून घेऊया याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात…

तज्ज्ञांच्या मते, गव्हाच्या चपात्यांमध्ये फक्त कार्बोहायड्रेट नसतं तर प्रोटीन आणि फायबरही असतं. हे अन्नातील असे दोन पौष्टीक घटक आहेत ज्यांची आपल्याला शरीराला गरज असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी चपात्या खाणं बंद करणं योग्य नाही.

chapati-1

> ६ इंचाच्या एका चपातीमध्ये १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ३ ग्रॅम प्रोटीन आणि ०.४ ग्रॅम फायबर असतं. यामुळे तुम्ही जर डाएटवर आहात तर तुमच्या शरीराला दिवसाला किती कार्बोहायड्रेट, प्रोटीन व फायबरची आवश्यकता आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

> जर तुम्हाला दिवसाला २५० ग्रॅम कार्बोहायड्रेट घेणे आवश्यक आहे. तर त्यातील ७५ ग्रॅम कार्बोहायड्रेट तुम्हाला चपातीमधून मिळू शकते. यासाठी तुम्ही रोज ५ चपात्या खाणं आवश्यक आहे.

> पण चपात्यांबरोबरच इतर खाद्यपदार्थांमधूनही तुम्हांला कार्बोहायड्रेट मिळतं हे लक्षात घ्यायला हवं. उदा. साखर, दूध आणि सोडा.

> दिवसा आपल्या शरीराची हालचाल वेगाने होत असते. यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचते. त्या तुलनेत रात्री शरीराचा वेग मंदावलेला असतो. यामुळे दुपारच्या जेवणात अथवा दुपारी चार वाजेपर्यंत चपात्या खाण्यास हरकत नाही.

> पण संध्याकाळी किंवा रात्री चपात्या खाणे टाळावे. त्याऐवजी फळांचा किंवा पालेभाज्यांचा रस, सूप, फळ, दूध किंवा हलका आहार घ्यावा. यास बँलन्स डाएट असे म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या