Tips : तुमचा कॉल रेकॉर्ड होतो आहे? जाणून घ्या कसं ओळखायचं

अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये वॉइस कॉल रेकॉर्ड करणं अगदी सोपं आहे. अनेक स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डचं फिचर दिलं जातं. ज्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे फिचर नाही ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात.

कुणाच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे एकप्रकारे चोरी मानली जाते. जर कुणाशी तुम्ही वैयक्तिक काही बोलत असाल आणि कुणी तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर तुमच्यासाठी ही एक गंभीर समस्या बनू शकते. म्हणून कॉलिंग करताना काही गोष्टींवर लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे कुणी गडबड करत असेल तर तुम्हाला ते तात्काळ लक्षात येईल.

कॉलिंगच्या दरम्यान जर तुम्हाला काही सेकंद किंवा मिनटानंतर ‘बीप’चा आवाज ऐकायला आल्यास जागरुक रहा. कारणा कॉर रेकॉर्डिंग सुरू असल्याचे संकेत देणारी ही सगळ्यात सोपी आणि सरळ पद्धत आहे. कॉलच्या सुरुवातीला किंवा मध्येच या बीप चा आवज ऐकायला मिळतो. असे झाल्यास सतर्क व्हा कारण कदाचित तुमचा कॉल रेकॉर्ड असेल. आता पुढल्या पद्धती जाणून घेऊ.

जर तुम्ही कुणाला कॉल केला आहे आणि त्या व्यक्तीनं तो स्पीकर वर टाकला. तर अशा वेळी तुमचा कॉल रेकॉर्ड करणं सहज शक्य आहे. कारण अन्य फोन किंवा रेकॉर्डरने कॉल रेकॉर्ड करता येऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत संवाद साधताना आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही त्याच्याशी बोलताना सतर्क रहा.

तिसरा पर्याय आहे की कॉलिंगच्या दरम्यान वेगळा ‘नॉइज’ येत असेल अशा स्थितीत सगळ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेकदा अधेमधे नॉइज ऐकायला येतो, अशावेळी देखील कॉल रेकॉर्ड करण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळेच कॉलिंग दरम्यान तुम्ही या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

असे अनेक अॅप्स आहेत जे बीप साउंड शिवाय कॉल रेकॉर्ड करतात. अशावेळी कॉल रेकॉर्डिंग सुरू आहे हे आपल्याला कळणार नाही. देशात सध्यातरी अशा प्रकारे कॉल रेकॉर्ड करण्यासंदर्भात कायदा नसल्याने कुणीही त्याचा वापर करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या