असं झालं तर… सतत मोबाईलचे स्टोरेज फुल्ल होतंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या मोबाईलचे स्टोरेज सतत फुल्ल होत असेल तर ही समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा वापर करा. सर्वात आधी स्टोरेजमधील पॅशे डेटा क्लिअर करा.

डिलीट केलेला पंटेंट ट्रश किंवा बिनमध्ये 30 दिवसांपर्यंत राहतो. तिथूनही तत्काळ डिलीट करा. मेमरी वाचवण्यासाठी क्लाऊड स्टोरेजचा वापर करा.

मोबाईलमध्ये अनेकदा एकाच पह्टोचे किंवा फाईलचे अनेक डय़ुप्लीकेट्स असतात. फाईल्ससारखे गुगल अॅप वापरून तुम्ही डुप्लीकेट्स शोधून डिलीट करू शकता.

पह्नमधील ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून प्रत्येक पह्टो डाऊनलोड होणार नाही. तुम्हाला हवा असलेला पह्टो किंवा फाईल डाऊनलोड होईल.

क्रोम ब्राऊझरमधील जुन्या डाऊनलोड फाईल्स किंवा कुकीज वेळोवेळी साफ केल्याने मोठी स्पेस मिळते. असे छोटे उपाय केल्यास पह्न स्पीडने चालू शकेल.