
मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट झाल्याचे समजताच फोन वापरणे बंद करून नवीन फोटो काढणे, अॅप्स डाऊनलोड करणे किंवा इंटरनेट वापरणे टाळा. गॅलरी किंवा फाइल मॅनेजरमधील रीसेंटली डिलीट किंवा ट्रश/रिसायकल बिन फोल्डर तपासा. जिथून तुम्ही तो सहज ‘रिव्हर्स’ किंवा ‘रिस्टोर’ करू शकता.
फोनमध्ये गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाउडचे ऑटो-बॅकअप सुरू असेल, तर त्या अॅप्समध्ये लॉग-इन करून तुमचा डेटा पुन्हा डाऊनलोड करू शकता. व्हॉट्सअॅपचा डेटा डिलीट झाला असेल, तर व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपचा वापर करा. अॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केल्यास जुना बॅकअप रिस्टोर होतो. डेटा न मिळाल्यास, मोबाईल कॉम्प्युटरला जोडून ‘डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर’चा वापर करा किंवा प्रोफेशनल मोबाईल मेकॅनिकची मदत घ्या.


























































