आपल्या आधार अंकाला लॉक करा, पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

आधार कार्ड हे प्रत्येक हिंदुस्थानीचे नागरिकत्व सिध्द करणारे प्रमुख कागदपत्र आहे. प्रत्येक आधार कार्डचा विशिष्ट असा एक आधार अंक असतो. तो आधार अंक सुरक्षित असावा व आपल्या आधार अंकाशी कोणी छेडछाड करू नये, यासाठी युनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) एक नवीन फिचर घेऊन येत आहेत. या फिचरद्वारे आपण आपला आधार अंक सुरक्षित करू शकतो. UIDAI च्या या फिचरचा मूळ हेतू आधार अंकाची गुप्तता व सुरक्षितता मजबूत करण्याचा आहे.

पुढील दोन प्रकारे आपण आधार अंक लॉक किंवा अनलॉक करू शकतो :

1.UIDAI च्या वेबसाईट (uidai.gov.in) ची मदत घेऊन.

  1. 1947 या क्रमांकावर UIDAI असा संदेश पाठवून.

UIDAI च्या वेबसाईट (uidai.gov.in) ची मदत घेऊन असा करा आधार मजबूत.

1 : सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईट वर जा.

2 : तेथे आधार सर्विसेस (Aadhaar services) द्वारे ‘माय आधार’ (My Aadhaar) व नंतर आधार लॉक/अनलॉक वर क्लिक करा.

3 : लॉक UID ऑप्शन सिलेक्ट करून तेथे आपला आधार अंक आणि आधार कार्ड अनुसार नाव, पिन कोड आणि सिक्युरीटी कोड अशी माहिती भरा.

4 : सर्व माहिती भरल्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा. हा OTP आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबर वर SMS द्वारे येईल. या OTPची वैधता 10 मिनिट असेल.

5 : OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

6 : सबमिट बटनावर क्लिक करताच आपला आधार अंक लॉक होईल.

लॉक केलेला आधार अंक अनलॉक करण्यासाठी…

1 : सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईट वर जा.

2 : तेथे आधार सर्विसेस (Aadhaar services) द्वारे ‘माय आधार’ (My Aadhaar) व नंतर आधार लॉक/अनलॉक वर क्लिक करा.

3 : तेथे अनलॉक UID ऑप्शन सिलेक्ट करून तयार केलेली वर्चुअल ID आणि सिक्युरीटी कोड टाका.

4 : आता Send OTP या पर्यायावर क्लिक करा. हा OTP आपल्या मोबाईल नंबर वर SMS द्वारे येईल. हा OTP 10 मिनिटांसाठी वैध असेल.

5 : OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

6 : सबमिट बटनावर क्लिक करताच आपला आधार अंक अनलॉक होईल.

SMS द्वारे लॉक करा आपला आधार अंक.

1 : OTP मिळवण्याकरता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 1947 या क्रमांकावर GETOTP व त्यापुढे आधार अंकातील शेवटचे चार अंक या फॉर्मॅट द्वारे संदेश पाठवा.

2 : संदेश पाठवताच UIDAI द्वारे सहा अंकी OTP येईल.

3 : त्यानंतर 1947 या क्रमांकावर LOCKUID<space> आधार अंकाचे शेवटचे चार अंक <space> OTP या प्रकारे संदेश पाठवताच आपला आधार अंक लॉक होईल.

SMS द्वारे लॉक केलेला आपला आधार अंक अनलॉक करण्यासाठी…

1 : OTP मिळवण्याकरता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 1947 या क्रमांकावर GETOTP<space> वर्चुअल ID अंकाचे शेवटचे 6 अंक या प्रकारे संदेश पाठवा.

2 : संदेश पाठवताच UIDAI द्वारे सहा अंकी  OTP येईल.

3 : त्यानंतर 1947 या क्रमांकावर UNLOCKUID<space> वर्चुअल ID अंकाचे शेवटचे 6 अंक <space> OTP या प्रकारे संदेश पाठवताच आपला आधार अंक अनलॉक होईल.