
WhatsApp वर ऑनलाइन न दिसता देखील तुम्ही कुणासोबतही चॅट करू शकता. WhatsApp वर असे करण्यासाठी काही सेटिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन दिसत नसून देखील चॅट करू शकतात.
अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण ऑनलाइन असल्याचं कुणाला कळू नये. अनेकजण ऑनलाइन स्टेटस हाइड करू इच्छितात. मात्र यासाठी अधिकृत कोणतंही सेटिंग उपलब्ध नाही. तुम्हाला ऑनलाइन राहिलेलं दिसू नये असं वाटत असेल तर Whatsapp वर न दिसता देखील तुम्ही चॅट करू शकतात.
यासाठी अगदी सोपी पद्धत तुम्ही स्वीकारू शकतात. WhatsApp वर कोणताही मेसेज ओपन करण्याआधी नोटिफिकेशन पॅनलमध्ये मेसेजला रिप्लाय करा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे बिलकूल कळत नाही.
स्मार्ट वॉचमधून तुम्ही जर रिप्लाय करत असाल तर तुम्ही ऑनलाइन आहात की नाही ते कुणाला कळत नाही.
WhatsApp वर मेसेज करताना जर तुम्ही डेटा ऑफ ठेवला असेल तरी देखील तुम्ही ऑनलाइन असल्याचे कळत नाही. Wi-Fi किंवा डेटा बंद करून WhatsApp ओपन करून रिप्लाय केल्यास ऑनलाइन स्टेटस काय आहे ते समोरच्यांना कळत नाही.
पुन्हा एकदा डेटा ऑन केल्यावर मेसेज सेंड होईल. ऑनलाइन स्टेटस देखील बदलणार नाही. म्हणजे तुम्ही ऑनलाइन असल्याचं युझरना कळणार नाही.






















































