
आषाढाच्या अंतिम दिवशी अर्थात् गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी, ‘उत्सव-आपल्या परंपरांचा’ या उपक्रमांतर्गत कालिदासायनम् या कार्यक्रमाचे आयोजन एच्. पी. टी. आर्ट्स अँड आर्. वाय्. के. सायन्स महाविद्यालयात केले गेले. सकाळी नऊ वाजल्यापासून, कार्यक्रम संपेपर्यंत विद्यार्थ्यांच्या उत्साहाने सर्व आसमंत भरून राहिला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रो . डॉ. विजयप्रसाद अवस्थी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे मा. उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रशांत देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे मा. उपप्राचार्य आणि आय् क्यू एस् सी समन्वयक डॉ. प्रणव रत्नपारखी होते. विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या मा. उपप्राचार्या प्रो. डॉ. अश्विनी घनबहादूर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने झाली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात, मा. प्राचार्य अवस्थी यांनी कालिदासाच्या काळाचा विचार करून, तत्कालीन सर्व साहित्यिकांच्या साहित्याचा विचार केला तर कालिदासाचे लेखन विशेष आपणास समजून येतात. कालिदास हा केवळ संस्कृत भाषेतील साहित्यकार नसून, त्याचा प्रभाव भारतातील सर्व भाषांच्या साहित्यिकांवर पडलेला आहे, हे सांगताना, मोहन राकेश यांच्या आषाढ का एक दिन, आधे अधूरे, लहरों के राजहंस या रचनांचा उल्लेख केला. कालिदास हा भारतीय संस्कृतीचा मानदंड आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन करणा-या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे प्रती कृतज्ञता ज्ञापन महाविद्यालयातील संस्कृतचे अध्यापक श्री. सोपान सोनवणे यांना केले.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी कालिदासायनमच्या अंतर्गत कालिदासाच्या कलाकृतींवर आधारित विषयांवर अभ्यासपूर्ण अशा प्रस्तुती दिल्या आणि होणा-या चर्चांमधून कालिदासांबद्दल अनेक नवीन गोष्टी उलगडून दाखविल्या. कालिदासाच्या कलाकृतींचा प्रेक्षकांना योग्य प्रकारे भाव समजण्यासाठी ही बाब सहायक ठरली. या चर्चासत्रात सुश्री मानसी कुलकर्णी, सुश्री गौरी पवार, सुश्री वैदेही पाटील, सुश्री संहिता देशपांडे, सुश्री मधुरा मालपाठक, सुश्री आर्या बिल्दिकर व सुश्री राधिका मुरकुटे यांनी आपले शोधनिबंध सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ‘एक संवाद कालिदासा संगे’ ही लघुनाटिका.
या नाटिकेने कार्यक्रमाला अद्भूत व भावपूर्ण असे वातावरण प्रदान केले. महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे नाटक खरंच नव्या पिढीला कालिदासाच्या कलाकृतींचे अध्ययन करायला प्रवृत्त करणारे होते. या लघुनाटिकेचे लेखन सुश्री आर्या कोतकर, दिग्दर्शन सुश्री भार्वि बक्षी, नेपथ्य कु. गौरव गायधनी, संगीत सुश्री मुक्ता शेपाळ, रंगभूषा आणि वेषभूषा सुश्री संहिता देशपांडे यांनी केले. या नाटिकेत कु. नचिकेत मुळे, सुश्री जाह्नवी भट, कु. सोहम गायधनी, कु. सर्वेश भटमुळे, कु. ओम् पवार, सुश्री युगा कुलकर्णी, सुश्री आर्या कोतकर, आणि सुश्री भार्वि बक्षी आपापली पात्रे चपखल अशी साकारली.
संस्कृत भाषा सभेच्या कोषाध्यक्ष श्रीमती शोभा सोनवणे, परांजपे क्लासच्या संचालिका श्रीमती सुषमा परांजपे, कृष्णद्वैपायन गुरुकुलाच्या सचिव सुश्री रुचिता पंचभाई, हस्तलेख्यम् संस्थेचे संचालक श्री चैतन्य गायधनी, महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील डॉ. लीना हुन्नरगीकर आणि श्री, निखिल जगताप, सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सहायक वृंद, आणि महाविद्यालयातील विविध विभागांचे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्री सिद्धी परदेशी व सुश्री जयती जुन्नरे यांनी केले. मान्यवरांचा परिचय सुश्री स्वरांगी बिडवई आणि सुश्री तन्मयी करमुंगीकर यांनी करून दिला. मंगलाचरण प्रसंगी सुश्री सई जाधव हिच्या भरतनाट्यम् नृत्याने आणि सुश्री सायंती शारंगपाणी हिच्या सुश्राव्य गायनाने तसेच सुश्री स्नेहा गद्रे आणि सुश्री वेदिका आम्भोरे यांच्या वादनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कालिदासायनम् या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका अर्थाने कालिदासाला समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्यातून गवसलेला आनंद, सर्वांना अनुभवावयास मिळाला.
HPT Arts and RYK Science College Hosts “Kalidasayanam” – A Deep Dive into Kalidasa
HPT Arts and RYK Science College Hosts “Kalidasayanam” – A Deep Dive into Kalidasa
On Thursday, July 24, 2025, the last day of Ashadh, HPT Arts and RYK Science College organized a special event called “Kalidasayanam” as part of their “Utsav – Aaplya Paramparancha” (Festival – Of Our Traditions) initiative. From 9 AM until the end, the college was abuzz with enthusiastic students.