मराठा मंदिर संकुलात आज ‘एचआर कॉन्क्लेव्ह’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा मंदिरच्या बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या वतीने ‘एचआर कॉन्क्लेव्ह 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता मुंबई सेंट्रलच्या जिवाजी राव शिंदे हॉल येथे संस्थेच्या संकुलात ही परिषद पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बीजभाषण ‘स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया’च्या बीएफएसआय क्षेत्राचे अध्यक्ष मोहन टांकसाळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दोन विशेष परिसंवाद होणार असून पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी एचडीएफसी एएमसीचे एचआर व सीएसआर प्रमुख अलोक शेओपुरकर व दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी सिएट कंपनीचे उपाध्यक्ष व एचआर प्रमुख जियान चंद गौतम हे असणार आहेत. या परिषदेत आयसीआयसीआय लोम्बार्ड, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या नामांकित पंपन्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.