हिंदुस्थानच्या हृदयचा गोल्डन शूट, वर्ल्ड चॅम्पियनशिप महिलांची सांघिक प्रकारात बाजी

21

सामना ऑनलाईन । चांग्वू (दक्षिण कोरिया)

हिंदुस्थानच्या नेमबाजांनी शूटिंग रेंजवर जबरदस्त कामगिरी करीत आयएसएसएफ जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (नेमबाजी) पदकांची लयलूट केली. हृदय हजारिकाने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये गोल्डन निशाणा साधला. तसेच महिलांनी सांघिक प्रकारात दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. इलावेनील वालारीवन हिने महिला एकेरीत रौप्य व श्रेया अगरवाल हिने कास्यपदक जिंकले. यामध्ये इलावेनीलने विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 18 पदकांची कमाई केली आहे.

summary-hriday won gold in shooting world championship

आपली प्रतिक्रिया द्या