‘वॉर’साठी वजन घटवणे ही माझ्या आयुष्यातली मोठी ‘लढाई’ – हृतिक रोशन

‘सुपर 30’ चित्रपटासाठी वजन वाढवलेल्या हृतिक रोशनला त्याचा आगामी ‘वॉर’ चित्रपटासाठी पुन्हा फिट अवतारात यायचे होते. त्यासाठी तब्बल दोन महिने हृतिकने दिवसरात्र मेहनत घेतली असून आता तो पुन्हा एकदा त्यांच्या फिट पर्सनॅलिटीमध्ये परतला आहे.

super-30-hrithik

वॉर चित्रपटात तो कबीर नावाच्या तरुणाच्या भूमिकेत दिसणार असून त्याची ही भूमिका अत्यंत ग्लॅमरस असणार आहे. ‘सुपर30 साठी मी वजन वाढवले होते. वाढलेल्या वजनामुळे मी आळशी झालेलो.पण सुपर 30 चे काम संपल्यानंतर लगेचच मला वॉरच्या शूटींगसाठी रुजू व्हायचे होते. मात्र वाढलेले वजन कमी करणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. ते कमी करण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली. 24 तास माझं काम सुरू असायचं. थोडा वेळ स्क्रिप्ट वाचनं, डॉक्टरकडे जाणं, जिममध्ये जाणं, डाएटीशियनकडे जाणं असं सर्व एकत्रं सुरू होतं. अखेर मोठ्या मेहनतीनंतर मी आज पूर्व रुपात आलो आहे. अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत दोन परस्परविरोधी भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं’, असं हृतिक सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या