उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाचा निकाल राज्यात अव्वल

2623

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने जुलै – ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा निकाल 23.17 टक्के लागला असून लातूर विभागाचा निकाल राज्यात सर्वाधिक 33.89 टक्के लागला आहे. महाराष्ट्रातील 1 लाख 917 विद्यार्थी अजूनही नापासच झालेले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल 35.07 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल 36.73 तर धाराशीव जिल्ह्याचा निकाल 26.29 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेला 12 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचे प्रभारी अध्यक्ष संजय यादगीरे यांनी निकालाची माहिती दिली. 9 जुलै ते 16 जुलै या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आलेली होती तर 17 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळाच्यावतीने परीक्षा घेण्यात आलेली होती. 131603 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 131355 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. त्यापैकी केवळ 30438 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. राज्याचा निकाल 23.17 टक्के लागला आहे. तब्बल 1 लाख 917 विद्यार्थी नापास झालेले आहेत.

पुणे विभागाचा निकाल 20.51 टक्के, नागपूर विभागाचा 28.32 टक्के, संभाजीनगर विभागाचा निकाल 28.16 टक्के, मुंबई विभागाचा निकाल 19.12 टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल 20.04 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 22.11 टक्के, नाशिक विभागाचा निकाल 26.18 टक्के, लातूर विभागाचा निकाल 33.89 टक्के तर कोकण विभागाचा निकाल 23.57 टक्के लागला आहे. लातूर विभागातील 7030 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 7017 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 2378 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त झाले. लातूर विभागाचा निकाल 33.89 टक्के लागला आहे. लातूर विभागातील 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. 262 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 343 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

10 वीचा निकाल पुढील आढवड्यात !
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल पुढील आढवड्यात लागणार आहे. लातूर विभागातील 17487 विद्यार्थ्यांना या निकालाची आतूरता लागलेली आहे. 11852 मुलांनी तर 5635 मुलींनी परीक्षा दिलेली आहे. लातूर विभागातील 55 परीक्षा वेंâद्रांवर ही परीक्षा घेण्यात आलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या