
सामना प्रतिनिधी, मुंबई
रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. रायगड जिल्ह्यात 84.97 टक्के निकाल लागला असुन यावेळीही मुलींनीचा निकालात बाजी मारली आहे. त्यामुळे रायगडातील मुली मुलांपेक्षा हुशार निघाल्या आहेत. तर जिल्ह्यात तालुकानिहाय निकालात माणगाव तालुका टक्केवारीत पुढे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. यावेळी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची निकाल पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. मात्र इंटरनेट सुविधा कोलमडली असल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र कालांतराने इंटरनेट सुविधा सुरू झाल्याने पालकासह विद्यार्थ्यांनी आपला निकाल पहिला. तर काहींनी मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून निकाल पहिला.
रायगड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 30 हजार 835 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यापैकी 30 हजार 801 विदयार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 1260 विद्यार्थी विशेष श्रेणी, 6172 प्रथम श्रेणी, 16 हजार 553 द्वितीय श्रेणी, 2188 तृतीय श्रेणी तर 26 हजार 173 विदयार्थी पास श्रेणीने पास झाले आहेत. रायगड विभागाचा एकूण निकाल हा 84.97 टक्के लागला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलींनीचा बाजी मारली आहे. मुले 75.64 टक्के तर मुली 89. 24 टक्केवारीने पास झाल्या आहेत. त्यामुळे रायगडातील मुली मुलापेक्षा हुशार निघाल्या आहेत.
तालुकानिहाय टक्केवारी
पनवेल 88.78%, उरण 82.23%, कर्जत 85.15%, खालापूर 73.69%, सुधागड 83.91%,
पेण 85.11%, अलिबाग 82.61%, मुरुड 82.32%, रोहा 80.47%, माणगाव 90.59%,
तळा 78.57%, श्रीवर्धन 85.71%, म्हसळा 89.39%, महाड 87.10%, पोलादपूर 78.22%
परभणीत बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी मारली बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 7.85 टक्के अधिक ठरले असून परभणी जिल्हा शैक्षणिक घसरणीमुळे चौथ्या क्रमांकाच्या स्थानावर गेला आहे.
परभणी जिल्ह्याचा निकाल 84.51 टक्के लागला आहे. संभाजीनगर विभागात परभणी जिल्हा चौथ्या स्थानावर पेâकला गेला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेतही यावर्षी निकालात घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे. 23 हजार 516 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले असून 1 हजार 411 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 91.72 टक्के लागला आहे. बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून 23 हजार 548 विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23 हजार 516 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.
परीक्षाअंती घोषित झालेल्या निकालानुसार 1411 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 9 हजार 163 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 9 हजार 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 287 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एवूâण 19 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे हे प्रमाण 84.51 टक्के एवढे आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 91.72 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा 90.97 टक्के, कला शाखेचा 76.74 टक्के तर व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 73.64 टक्के लागला आहे. संभाजीनगर विभागामध्ये संभाजनीगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, त्या खालोखाल बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल लागला आहे.
लातूर विभागाचा निकाल 86.02 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने 12 वी परीक्षेचा निकाल आज जाहिर करण्यात आला. लातूर विभागाचा निकाल 86.02 टक्के लागला आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 91.14 टक्के, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 82.19 टक्के आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय प्रभारी सचिव चित्तप्रकाश देशमूख यांनी दिली.
लातूर विभागीय परीक्षा मंडळात घेतलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी सहसचिव संजय पंचगले, वरिष्ठ अधिक्षक एच.पी.कोनेरी हे उपस्थित होते. लातूर विभागामध्ये लातूर, नांदेड आणि धाराशिव या तिन जिल्ह्यांचा समावेश आहे. लातूर विभागात 49130 मुले, 37017 मुली परिक्षेसाठी प्रविष्ठ झालेले होते. प्रत्यक्षात 48999 मुलांनी तर 36950 मुलींनी असे एकूण 85949 जणांनी परिक्षा दिलेली होती. 40274 मुले तर 33714 असे एकूण 73988 उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल 86.08 टक्के लागला आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 91.24 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 82.19 टक्के राहिले.
लातूर जिल्ह्यातील 290 महाविद्यालयातील 29965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याचा निकाल 87.50 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील 261 महाविद्यालयातील 31070 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून नांदेड जिल्ह्याचा निकाल 86.20 टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 142 महाविद्यालयातील 12953 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 82.72 टक्के लागला आहे. लातूर विभागातील विज्ञान शाखेचा निकाल 93.05 टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल 78.44 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 92.93 टक्के लागला आहे तर एमसीव्हीसीचा निकाल 74.69 टक्के लागला आहे.
लातूर जिल्ह्यातील 2516 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 12756 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 14188 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील 2614 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम श्रेणीत 13690 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 14051 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 632 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम श्रेणीत 4240 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 7583 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
लातूर विभागातील 591 विद्यार्थी क्रिडागुणांसाठी पात्र ठरलेले आहेत. 639 विद्याथ्र्यांचे प्रस्ताव मंडळाकडे सादर करण्यात आलेले होते. लातूर जिल्ह्यातील 266 पैकी 259 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील 143 पैकी 115 प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर धाराशिव जिल्ह्यातील 230 प्रस्तावांपैकी 217 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. स्काऊटचे गुण मिळवण्याठी विभागातील 26 प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते. परंतू एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. लातूर मधील 4 तर धाराशिव जिल्ह्यातील 22 प्रस्तावांचा त्यात समावेश होता. मागील वर्षी पेक्षा यावर्षी लातूर विभागाचा निकाल 2.29 टक्के कमी लागलेला आहे.
लातूर जिल्ह्याचा निकाल 87.50 टक्के लागलेला आहे. जिल्ह्यातील लातूर तालुक्याचा निकाल 89.36 टक्के लागला आहे. अहमदपूर तालुक्याचा निकाल 85.28 टक्के, औसा तालुक्याचा निकाल 86.68 टक्के, चाकीर तालुक्याचा निकाल 87.23 टक्के, देवणी तालुक्याचा निकाल 89.22 टक्के, जळकोट तालुक्याचा निकाल 81.67 टक्के, निलंगा तालुक्याचा निकाल 86.22 टक्के, रेणापूर तालुक्याचा निकाल 78.22 टक्के, शिरुर अनंतपाळ तालुक्याचा निकाल 91.55 टक्के, उदगीर तालुक्याचा निकाल 86.45 टक्के लागला आहे.
धाराशिव जिल्ह्याचा निकाल 82.72 टक्के लागलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्याचा निकाल 86.62 टक्के लागला आहे. भुम तालुक्याचा निकाल 73.14 टक्के लागला आहे. कळंब तालुक्याचा निकाल 75.96 टक्के, लोहारा तालुक्याचा निकाल 88.24 टक्के लागला आहे. उमरगा तालुक्याचा निकाल 80.71 टक्के, परंडा तालुक्याचा निकाल 87.06 टक्के, तूळजापुर तालुक्याचा निकाल 81.16 टक्के तर वाशी तालुक्याचा निकाल 82.89 टक्के लागला आहे.
नांदेड जिल्ह्याचा निकाल 86.20 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याचा निकाल 87.62 टक्के, अर्धापूर तालुक्याचा निकाल 88 टक्के, भोकर तालुक्याचा निकाल 88.53 टक्के, बिलोली तालुक्याचा निकाल 82.40 टक्के, देगलूर तालुक्याचा निकाल 84.12 टक्के, धर्माबाद तालुक्याचा निकाल 77.74 टक्के, हदगाव तालुक्याचा निकाल 83.10 टक्के, हिमायतनगर तालुक्याचा निकाल 70.47 टक्के, कंधार तालुक्याचा निकाल 90.05 टक्के, किनवट तालुक्याचा निकाल 85.24 टक्के, लोहा तालुक्याचा निकाल 85.27 टक्के, माहूर तालुक्याचा निकाल 81.90 टक्के, मुखेड तालुक्याचा निकाल 89.44 टक्के, मुदखेड तालुक्याचा निकाल 79.59 टक्के, नायगाव तालुक्याचा निकाल 89.12 टक्के, उमरी तालुक्याचा निकाल 78.55 टक्के लागला आहे.
नगर जिल्हातही मुलीच वरचढ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला. या निकालात नगर जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या. 93 टक्के मुली, तर 84 टक्के मुलांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. नगर शहराचा निकाल 89 टक्के लागला. पुणे बोर्डाचा एकूण निकाल 85 टक्के लागला. बोर्डाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलींचे पास होण्याचे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले. एकूणच निकालाची आकडेवारी पाहता नेहमीप्रमाणे पोरीच डोकेबाज असल्याचे स्पष्ट झाले.
नगर जिल्ह्यातील 36 हजार 818 मुले आणि 25 हजार 522 मुली अशा एकूण 62 हजार 340 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. निकालात 31 हजार 39 मुलं (84.30 टक्के) आणि 23 हजार 863 मुली (93.50 टक्के) अशा एकूण 54 हजार 902 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होत महत्त्वाचा टप्पा पार केला. नगर शहरातील 9 हजार 940 विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 886 विद्यार्थी पास झाले. शहराचा निकाल 89.06 इतका लागला.
जिल्ह्यातून 62 हजार 340 विद्यार्थ्यांनी परीक्षादिली होती. त्यापैकी 54 हजार 902 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शास्त्र शाखेचा 96.23 टक्के निकाल लागला आहे. 31 हजार 645 पैकी 30 हजार 451 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा सर्वांत कमी 74.04 टक्के निकाल लागला असून, 20 हजार 307 पैकी 15 हजार 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच, वाणिज्य शाखेचा 92. 09 टक्के निकाल लागला आहे. 9 हजार 266 पैकी 8 हजार 533 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्वांत जास्त टक्केवारीत जामखेड तालुक्याने आघाडी घेतली असून, या तालुक्याचा 92.87 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वांत कमी श्रीरामपूर तालुक्याचा 76.74 टक्के निकाल लागला आहे. तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे अकोले 82.00 टक्के, जामखेड 92.87 टक्के, ककर्जत 91.87, कोपरगाव 87.41 टक्के, नगर 89.06 टक्के, नेवासा 83.69 टक्के, पारनेर 89.82 टक्के, पाथर्डी 92.40 टक्के, राहाता 87.29, राहुरी 83.84 टक्के, संगमनेर 90.04 टक्के, शेवगाव 92.15 टक्के, श्रीगोंदा 90.03 टक्के, श्रीरामपूर 76.74 टक्के.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण 12,21,159 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामधील मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 82.40 टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.25 टक्के आहेत. पुणे विभागातून एकूण 2,40,434 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 84.11 % म्हणजेच 1,15,282 मुले तर 92.88 % मुली म्हणजेच 96,012 मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच मुंबईत हेच प्रमाण 80.10 % आणि 88.4 % इतके आहे. तर कोकणातील उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थांपैकी मुलींचे प्रमाण जास्त आहे. 14,700 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 14,912 मुले 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.


























































