लेबनन देशाची राजधानी बेरुटमध्ये दोन भीषण स्फोट, हजारो लोक जखमी

1127

मध्य पूर्वेतील देश लेबननची राजधानी असलेल्या बेरुटमध्ये सलग दोन भीषण स्फोट झाले आहेत. या स्फोटात हजारो लोक जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बेरुटमध्ये आज दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटाने संपूर्ण शहर हादरले आहे. या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून हजारो लोक जखमी झाले आहेत. स्फोटानंतर बेरुटवर मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट दिसत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजधानीच्या बंदराच्या ठिकाणे हा स्फोट झाला असून या भागात मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत.

या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटात हजारो लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा अजून कळालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या