
ऑस्ट्रेलियाच्या सरकारी माध्यम संस्था एबीसीचे शेकडो पत्रकार बुधवारी संपावर गेले. मागील 20 वर्षांत एबीसीचे पत्रकार संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचाऱयांच्या युनियनने वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने हे कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचाऱयांना वेतनवाढ हवी आहे. कामाची स्थिती आणि एआयचा वाढता वापर यामुळे पत्रकारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱयांना तीन वर्षांत एकूण 10 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु हा प्रस्ताव पत्रकारांनी मान्य केला नाही. एबीसीमध्ये 4,400 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
























































