पूर्व पत्नीशी कायदेशीर लढण्या ऐवजी तलवारीने लढण्याची परवानगी द्या, पतीची अजब मागणी

2088

जगात चित्रपट आणि वेबसीरीजचे मोठे चाहते असतात. ते पाहून लोक तसेच काहीसे करण्याचे प्रयत्न करतात. आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीशी कायदेशीर लढण्या ऐवजी तलवारीने लढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी एका पतीने केली आहे.

गेम ऑफ थ्रोन्स या वेबसीरीजमध्ये ट्रायल बाय कोम्बॅट नावाची संकल्पना आहे. त्यात दोन पक्षातील लोकांनी आपला वाद संपवण्यासाठी तलवारीने लढण्याची परवानगी होती. त्यालाच ट्रायल बाय कोम्बॅट असे म्हणतात. हा लढा अतिशय क्रूर पद्धतीने लढला जायचा. त्यात प्रतिस्पर्धी एकमेकांना तलवारीने मारायचे तसेच शेवटी प्रतिस्पर्ध्याचा खून करून जो व्यक्ती जिंकेल त्याच्या बाजूने निकाल लागला जायचा.

आपल्या पूर्वाश्रमीच्या बायकोशी आधीचे वाद संपवण्यासाठी कायदेशीर नव्हे तर अशा प्रकारे ट्रायल बाय कोम्बॅट पद्धतीने लढावे अशी मागणी पतीने केली आहे. कोर्टात सादर केलेल्या पत्रात त्याने तसे म्हटले आहे. अमेरिकेतील डेव्हिड ओस्ट्रॅम याचे आपल्य पूर्व पत्नीशी संपत्तीवरून वाद आहे. तसेच डेव्हिड हा गेम ऑफ थ्रोन्सचा मोठा फॅन आहे. आपल्या देशात अशा प्रकारच्या लढ्याला बंदी नाही असे डेव्हिडने म्हटले आहे. तसेच इंग्लंडमध्ये 1818 पर्यंत ही प्रथा रूढ असल्याचे त्याने सांगितले. जपानी तलवारीबाजी शिकण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा अशी मागणीही डेव्हिडने केली आहे.

न्यायालयाकडून पुढील कारवाईसाठीची योग्य पावले उचलली जात नाही तोपर्यंत हे न्यायालय या खटल्यासंदर्भात, त्यातील दोन्ही पक्षांच्या आक्षेपांबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार नाही असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या