पतीचा पत्नीवर बलात्कार, कोर्टाकडून पतीची सुटका

5043
law

दिल्लीत एका पतीने आपल्य पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी कोर्टाने पतीची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यावेळी पतीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले त्यावेळी दोघांचे लग्न झाले होते असे कारण न्यायालयाने दिले आहे.

दिल्लीत एका व्यक्तीचे 2 नोव्हेंबर 2015 रोजी एका तरुणीशी लग्न झाले होते. नंतर पतीला चोरीच्या आरोपाखाली अटक झाल्याने पत्नी पतीपासून विभक्त झाली होती. ती दिल्लीला निघून अल्यानंतर पतीही तिच्यामागे दिल्लीला आला. पुढे आपण असे काही करणार नाही असे वचन पतीने पत्नीला दिले आणि दोघे राहू लागले.

नंतर पतीने पत्नीचे दोन लाख रुपये चोरले. पत्नीने पोलिसांकडे चोरीची तसेच बलात्काराची तक्रार नोंदवली. 5 जुलै 2016 रोजी पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले. परंतु जेव्हा पतीने पत्नीशी जबरदस्ती शारीरीक सबंध ठेवले ते दोघे विवाहित होते. या कारणावरून न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली.

आपली प्रतिक्रिया द्या