थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 116 वी जयंती आणि समाजरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आळंदीतील क्रांती पार्क येथे विनम्र अभिवादन सभेत क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, समाजरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करीत साजरी करण्यात आली.
आळंदीत कष्टकरी बांधकाम मजूर संघ, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, कष्टकरी पंचायत, पथारी सुरक्षा दल, टपरी पथारी, हातगाडी व्यावसायिक सर्व मजूर यांचे वतीने संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विनम्र अभिवादन, प्रतिमाच पूजन, प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र वेल्फेअर असोशिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष रवींद्र जाधव, पुणे जिल्हा सुरक्षा दल अध्यक्ष संतोष सोनवणे, संयोजक अर्जुन मेदनकर, हुतात्मा राजगुरू बांधकाम मजूर संघ अध्यक्ष सुलतान शेख, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, दिनकर तांबे, उद्योजक संकेत वाघमारे,राजेश नागरे, सचिन आढागळे, पर्वत चाटे, विठ्ठल भारती, जगन्नाथ हरगुडे, सोशल मीडिया विभाग प्रमुख वैभव दहिफळे, शिवाजी वाटमोरे, दत्तात्रय मुंजाळ, विकास धामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अर्जुन मेदनकर म्हणाले, क्रांतिकारकांचे कार्यातून प्रेरणा घ्यावी. त्यांचे विचार आचरणात आणून समाज विकास साधण्याची गरज आहे. येथील एकही टपरी, पथारी, हातगाडी वाला त्यांना उपलब्ध असलेल्या जागेपासून वंचित राहणार नाही. उर्वरित व्यावसायिकांचे देखील व्यावसायिक जागांचा सर्व्हे करून नगरपरिषदेच्या माध्यमातून झोन निहाय जागा वाटप करण्यासाठी यापुढील काळात पाठपुरावा केला जाईल. कोणताही व्यावसायिक जागे पासून वंचित रहाणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. टपरी पथारी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे म्हणाले, समाजरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांचे कार्याची केंद्र सरकारने दखल घ्यावी. यापुढील काळात टपरी पथारी विक्रेते व्यावसायिक यांचे न्याय हक्कासाठी प्रभावी आंदोलन उभे केले जाईल. पथारी वाले धोरणावर कार्यवाही आणि येत्या काळात समिती गठीत करण्यात येईल असे सांगितले. सुल्तानभाई शेख यांनी सूत्रसंचालन केले.