हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

10618

हैदराबादमध्ये डॉक्टरवर बलात्कार करून तिला अत्यंत निर्घृणपणे जाळून ठार मारण्यात आलं होतं. (Disha Case) 28 नोव्हेंबरला झालेल्या या गुन्ह्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींचा पोलिसांकडून शुक्रवारी पहाटे एन्काऊंटरमध्ये (Encounter) खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीनंतर आरोपींच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

या चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी घटनेचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी नेले होते. यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र तरीही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना अखेर शस्त्र उचलावे लागले. पोलिसांनी चारही जणांना एन्काऊन्टरमध्ये ठार मारले आहे.

चार नराधमांनी या बलात्कार प्रकरणाचा कट रचला होता. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरची स्कुटी त्यांनी पंक्चर केली होती. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने या नराधमांनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घृणास्पद कृत्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला. संतापाची एकच लाट पसरली.

आपली प्रतिक्रिया द्या