मोठी दुर्घटना! हैदराबादमधील सिकंदरबाद येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमधील सिकंदराबाद येथील एका बहुमजली इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आगीची घटना समोर आली आहे. सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू असून अनेक लोक गंभीररित्या भाजले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर अग्निशमन दलाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हैदराबादचे जिल्हा दंडाधिकारी अमोय कुमार यांनी सांगितले की, आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरल्याने पीडितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, एक मृत व्यक्ती, ज्याचे वय सुमारे 20 असल्याचे सांगितले जात आहे, त्याचा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. ते वारंगल, महबूबाबाद आणि खम्मम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.